1 ते 5 चरण भरुन झाल्यानंतर नोंदणी फी ऑनलाईन खालीलप्रमाणे भरावी लागेल –
महाराष्ट्र विवाह नोंदणी नियम १९९८ - [५ (२)] प्रमाणे विवाह विधिवत व शास्त्रोक्त पद्धतीने झाल्यास विवाह दिनांकापासून
1] 1 ते 90 दिवसापर्यंत – र.रु. 65/-
2] 91 ते 730 दिवसापर्यंत – र.रु. 265/-
3] 730 दिवसांच्या पुढे – र.रु. 765/-
• सूचना - [ महाराष्ट्र विवाह मंडळाचे अधिनियम १९९८ व विवाह नोंदणी नियम १९९९ नुसार ]
फक्त महाराष्ट्र राज्यात संपन्न झालेल्या विवाहाकरीता
1] नागरिकांनी घेतलेल्या Appointment तारखेस वेळेवर कार्यालयात उपस्थित रहावे. तसेच मा. आयुक्त यांचे आदेशान्वये दिलेल्या तारखेच्या दिवशी येताना जोडलेले सर्व PDF कागदपत्रांची ओरिजनल प्रत सोबत घेऊन येणे बंधनकारक असेल.
2] नागरिकांनी घेतलेल्या Appointment तारखेस कार्यालयीन कामकाजासाठी निबंधक/उपनिबंधक उपलब्ध नसतील तर Appointment बदलून दिली जाईल याची नोंद घ्यावी
3] लग्न कोठेही झाले असले तरी वर किंवा वधु त्यांचे रहिवासी शहरात विवाह नोंदणी अर्ज करु शकतात. वर वा वधू यांच्या राहण्याचे ठिकाण विवाह निबंधकाच्या कार्यकक्षेत असणे आवश्यक आहे. विवाह नोंदणीचे प्रत्येक ज्ञापन (अर्ज) नमुना ‘ड’ मध्ये पूर्ण भरून देणे आवश्यक आहे.
4] पारसी, ख्रिश्चन व ज्यू या धर्मीयांची नोंदणी या कायद्याअंतर्गत करण्यात येत नाही.
5] मुस्लीम धर्मीय वर - वधू असतील तर निकाह नाम्याची अधिकृत इंग्रजी भाषांतरीत प्रत सोबत आणावी.
6] ज्ञापनासोबत सर्वसाधारण स्थितीत सम धर्मीय (हिंदू व मुस्लीम) वधू - वरांसाठी पुढील दस्तऐवज जोडणे आवश्यक आहे
विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे
1] अर्जाचा नमुना डाउनलोड करा. अर्ज भरुन स्कॅन करुन PDF format मधे अपलोड करणे आवश्यक
डाऊनलोड अर्जाचा नमुना
2] वर व वधु यांचे स्वयंघोषणापत्राचा नमुना डाउनलोड करा. नमुना भरुन स्कॅन करुन PDF format मधे अपलोड करणे आवश्यक
3] वर व वधु यांचे आधार कार्ड
4] वर व वधु यांचा शाळा सोडलेला दाखला किंवा जन्माचा व जातीचा शासकीय पुरावा (जन्मतारीख व जात पडताळणीसाठी)
5] वर व वधु यांचे पत्याच्या पुरावासाठी रेशन कार्ड / लाईट बिल / पासपोर्ट / मतदान कार्ड / टेलिफोन बील (अर्जदाराच्या नावे)
6] पुरोहित/काझी यांचे आधार कार्ड
7] 3 साक्षीदारांचे आधार कार्ड
8] लग्नपत्रिका व लग्नातील फोटो
9] आंतरजातीय विवाह असेल तर 100 रु स्टँम्पवर ऍ़फिडेव्हीट करुन आणणे. वर व वधु यांचे स्वतंत्र 100 रु स्टँम्पवर ऍ़फिडेव्हीट करुन आणणे.नमुना डाउनलोड करा.
डाऊनलोड ऍ़फिडेव्हीट मजकूर नमुना
10] घटस्फोटीत असल्यास घटस्फोटाचा न्यायालयीन हुकुमनामा जोडणे आवश्यक आहे
11] विधुर असल्यास पहिल्या पती/पत्नीचे मृत्यु दाखला
12] सर्व कागदपत्रे PDF करुन चरण 5 मध्ये जोडावी. PDF File ची साईज 2 MB पेक्षा कमी असावी
13] विवाह नोंदणीसाठी नोंद करताना वधू व वर यांनी आपली संपूर्ण माहिती ही मराठी व इंग्रजी मध्ये अचूक भरावी कारण तीच माहिती सर्टिफिकेटवर प्रिंट होते.
आवश्यकतेनुसार निबंधकांनी मागविलेल्या कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक राहील